रेणावीतील रेवणसिद्ध यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST2021-03-06T04:25:26+5:302021-03-06T04:25:26+5:30

विटा : रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्ध देवाची दि. ११ ते १३ मार्च या कालावधीतील महाशिवरात्रीची यात्रा ...

Revansiddha Yatra in Renavi canceled | रेणावीतील रेवणसिद्ध यात्रा रद्द

रेणावीतील रेवणसिद्ध यात्रा रद्द

विटा : रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्ध देवाची दि. ११ ते १३ मार्च या कालावधीतील महाशिवरात्रीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी येथील बैठकीत घेण्यात आला.

रेणावी येथील रेवणसिद्ध यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीला असते. यावर्षीही दि. ११ मार्च ते १३ मार्चपर्यंत यात्रेचा कालावधी होता. परंतु, सध्या कोरोनाचा उपद्रव वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत भाविकांची गर्दी होणाऱ्या यात्रा, जत्रा रद्दचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तहसीलदार ऋषिकेत शेळके व पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तहसील कार्यालयात रेणावी येथील ग्रामस्थ, रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, पुजारी, मानकरी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार शेळके यांनी यात्रा व यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करावेत, अशी विनंती केली. उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी यात्रा रद्दचा निर्णय घेतला. धार्मिक पूजाअर्चावगळता कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. महाशिवरात्रीपासून तीन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

बैठकीस भाकणूक अय्या देव, रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव, उपाध्यक्ष मदन गुरव, बाळकृष्ण गुरव, जयराम गुरव, उपसरपंच कुमार पवार, हिंमतराव पाटील, संजय यादव, संपत पाटील, अ‍ॅड. संदीप गायकवाड, शिवाजी साखळे, जगदीश गुरव उपस्थित होते.

Web Title: Revansiddha Yatra in Renavi canceled