शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मिरजेत निवृत्त एसटी अधिकाऱ्यास डिजिटल अरेस्टच्या भीतीने सव्वा कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:00 IST

रक्कम न भरल्यास बँक खाती गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली

मिरज (जि. सांगली) : पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत मिरजेतील एका निवृत्त एसटी अधिकाऱ्याची एक कोटी पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिरजेतील गुलमोहर कॉलनीतील रवींद्र कुलकर्णी यांना ३ ते १२ सप्टेंबर या कालावधीत व्हॉट्सॲप कॉल व मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. स्वतःला पोलिस अधिकारी म्हणवणाऱ्या भामट्यांनी तुमच्या नावावर सिम कार्ड घेऊन त्या आधारे बँक अकाउंट काढून त्यावर मोठ्या रकमेचे हवाला व्यवहार झाल्याचे सांगितले.

विजय मल्ल्या टोळीतील नरेश गोयल यांच्या घरातून २५० बनावट बँक पासबुक सापडले. त्यात कुलकर्णी यांचेही पासबुक सापडले असून, याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा एफआयआर दाखल केला आहे. पासबुक सापडलेल्या अनेकांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सीबीआयकडे असल्याची बतावणी करण्यात आली.भामट्यांनी कुलकर्णी यांच्याकडून सर्व बँक खात्याचे तपशील घेतले. कुलकर्णी यांना रिझर्व्ह बँकेची कमिटी तुमच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करणार असून, त्यासाठी बँक खात्यातील ९५ टक्के रक्कम पडताळणीसाठी दिलेल्या खात्यावर ट्रान्सफर करावी लागेल, असे सांगितले. रक्कम न भरल्यास बँक खाती गोठवून अटकेच्या कारवाईची धमकी देण्यात आली.

यामुळे कुलकर्णी यांनी त्यांच्या तीन बँक खात्यांतील सव्वा कोटी रक्कम मुंबई, कोलकाता, दिल्ली, हरियाणा या विविध राज्यांतील पाच वेगवेगळ्या बँक खात्यांवर दहा दिवसांत आरटीजीएसने वर्ग केली. ही रक्कम ७२ तासांत परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर फोन बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुलकर्णी यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Retired Officer Duped of ₹1.25 Crore in Digital Arrest Scam

Web Summary : A retired ST officer in Miraj lost ₹1.25 crore to scammers posing as police and CBI officials. They used the fear of a 'digital arrest' and fabricated bank fraud allegations to extort money over ten days through RTGS transfers to various accounts.