भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्रातर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST2021-02-26T04:39:08+5:302021-02-26T04:39:08+5:30

भिलवडी : येथील सानेगुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने २०२० मध्ये सेवानिवृत्त होऊन गावी आलेल्या भिलवडी आणि परिसरातील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. ...

Retired Soldiers felicitated by Sane Guruji Sanskar Kendra in Bhilwadi | भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्रातर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार

भिलवडीत साने गुरुजी संस्कार केंद्रातर्फे सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार

भिलवडी

: येथील सानेगुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने २०२० मध्ये सेवानिवृत्त होऊन गावी आलेल्या भिलवडी आणि परिसरातील सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

आजी माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील होते. केंद्रप्रमुख सुभाष कवडे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा, सैनिक दलाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे व राष्ट्रभक्ती वृद्धिंगत व्हावी या हेतूने गेली पाच वर्ष सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार केला जात आहे. सचिव जी. के. शेख यांनी स्वागत केले. यावेळी प्रदीप पाटील, मौलाना नायकवडी, अभिजित यादव, कैयुम पठाण या सेवानिवृत्त सैनिकांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मुबारक पठाण, प्रताप पाटील, बाबासाहेब जमादार, सलीम मुल्ला, गोविंद कोळी, मारुती यादव उपस्थित होते.

Web Title: Retired Soldiers felicitated by Sane Guruji Sanskar Kendra in Bhilwadi