दिघंचीत काकासाहेब जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमत्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:29 IST2021-03-01T04:29:59+5:302021-03-01T04:29:59+5:30

फोटो ओळ : दिघंची (ता. आटपाडी) येथे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब जाधव यांचा शिवप्रतिष्ठान कार्यालयात ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात ...

Retired felicitation of Kakasaheb Jadhav | दिघंचीत काकासाहेब जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमत्त सत्कार

दिघंचीत काकासाहेब जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमत्त सत्कार

फोटो ओळ : दिघंची (ता. आटपाडी) येथे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब जाधव यांचा शिवप्रतिष्ठान कार्यालयात ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क

दिघंची : दिघंची (ता. आटपडी) येथे सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

काकासाहेब जाधव हे देवापूर (ता. माण) येथील आहेत. मात्र, दिघंचीकरांसोबत त्यांचे आपुलकीचे नाते, प्रत्येकाला मदत करणे हीच जाधव यांची ओळख होती. सेवा बजावत असताना कधी त्यांनी कायद्याचा आव आणला नाही. ३७ वर्षे पोलीस खात्याची प्रामाणिक व एकनिष्ठेने सेवा केली. सांगली शहर, विश्रामबाग, विटा, आटपाडी या पोलीस ठाण्यांत सेवा बजावली. आटपाडी पोलीस ठाण्यात त्यांनी १२ वर्षे सेवा केली. प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची वृत्ती असल्याने सर्वसामान्यांना ते पोलीस न वाटता आपलाच माणूस आहे असे वाटायचे. सेवानिवृत्त झाल्याने विटा पोलिसांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस सेवेतून निवृत्त झालेला आपल्या हक्काचा माणूस म्हणून दिघंचीकरांनी काकासाहेब जाधव यांचा शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन शिवप्रतिष्ठान कार्यालयात सत्कार केला.

यावेळी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव गुरव, सोपान काळे, अमोल सावंत, विवेकानंद जितकर, संजय पाटोळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Retired felicitation of Kakasaheb Jadhav