शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डोर्ली फाट्यानजीक निवृत्त सुभेदाराचा खून, कारण अस्पष्ट; मोटार घेऊन संशयित फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:15 IST

तासगाव : तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा येथे लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५, रा. बलगवडे) यांचा लोखंडी ...

तासगाव : तासगाव तालुक्यातील डोर्ली फाटा येथे लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५, रा. बलगवडे) यांचा लोखंडी सळईने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. बुधवारी रात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.मृत गणपती शिंदे हे लष्करातील निवृत्त सुभेदार होते. नवी डोर्ली फाट्यालगत बलगवडे हद्दीतील शेतात त्यांचे घर आहे. घरात ते एकटेच वास्तव्यास होते. त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त परगावी राहतात. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शेजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शिंदे यांना हाक मारली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. घराचे दरवाजेही उघडे दिसल्याने आत डोकावून पाहिल्यानंतर शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिस पाटील हनुमंत पाटील यांना दिली. हनुमंत पाटील यांनी तासगाव पोलिसांना कळविल्यानंतर उपाधीक्षक सचिन थोरबोले, निरीक्षक साेमनाथ वाघ, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर लोखंडी सळईने मारहाण करून निर्घृणपणे खून केल्याचे दिसून येत होते. खुनानंतर संशयित शिंदे यांची माेटार घेऊन फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली. तासगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांना तपासाबाबत सूचना केल्या. संशयिताच्या तपासासाठी पथके रवाने रवाना करण्यात आली. खुनानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. याबाबत मृत गणपती शिंदे यांचा मुलगा अमित गणपती शिंदे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस