रेठरेधरणला भांडण सोडविणाऱ्यास जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:19 IST2021-07-18T04:19:36+5:302021-07-18T04:19:36+5:30

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे डोळे वटारून पाहिल्याचा जाब विचारण्यावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्यास दोघांनी लोखंडी सळीने ...

Rethredharan was severely beaten by the person resolving the dispute | रेठरेधरणला भांडण सोडविणाऱ्यास जबर मारहाण

रेठरेधरणला भांडण सोडविणाऱ्यास जबर मारहाण

इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे डोळे वटारून पाहिल्याचा जाब विचारण्यावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्यास दोघांनी लोखंडी सळीने मारहाण करत गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. राहुल जयवंत पाटील असे जखमीचे नाव आहे.

याबाबत प्रशांत हौसेराव पाटील (३२) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून सचिन विश्वास पाटील आणि योगेश महादेव खामकर (दोघे रा. रेठरेधरण) यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रशांत आणि राहुल शुक्रवारी रात्री मारुती मंदिर परिसरात बोलत थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या सचिन आणि योगेश यांनी प्रशांतला डोळे वटारून पाहिल्याचा जाब विचारत त्याच्याशी भांडण काढले. हे भांडण सोडविण्यास राहुल मध्ये पडला होता. तेव्हा सचिन आणि योगेशने त्यालाच लोखंडी सळीने बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना घडल्यावर दोघांनी तेथून पळ काढला. हवालदार सोमनाथ पाटील अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rethredharan was severely beaten by the person resolving the dispute