इस्लामपूरात राष्ट्रवादीच्या शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:26+5:302021-09-18T04:29:26+5:30
फोटो- इस्लामपूर येथील शिराळा नाका परिसरात ‘योजना आपल्या दारी’ शिबिराचे दादासाहेब पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, शकील जमादार, इलियास ...

इस्लामपूरात राष्ट्रवादीच्या शिबिरास प्रतिसाद
फोटो- इस्लामपूर येथील शिराळा नाका परिसरात ‘योजना आपल्या दारी’ शिबिराचे दादासाहेब पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, शकील जमादार, इलियास पिरजादे, राजाराम जाधव, मोहन भिंगार्डे यांच्याहस्ते दाखले वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने शहराच्या विविध भागांत घेतलेल्या ‘योजना आपल्या दारी’ शिबिराचा १३५० नागरिकांनी लाभ घेतला आहे. शहराच्या विविध भागांत ७ शिबिरे पूर्ण झाली असून आणखी १५ शिबिरे होणार आहेत.
शिराळा नाका येथील आण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलमधील शिबिराचा प्रारंभ नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्याहस्ते करण्यात आला. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे राष्ट्रीय सचिव अबीद मोमीन, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष शकील जमादार, गोपाळ नागे, मोहन भिंगार्डे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. अभिजित रासकर, तन्वीर चाऊस, हिंमत डांगे, अमोल नाईक, इलियास पिरजादे, जाराम जाधव यांनी संयोजन केले.
कापुसखेड नाका येथील विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम स्कूल, शिवनगर येथील परदेशी हॉल, राजारामबापू रक्तपेढी येथील मेडिकल असोसिएशन हॉल, तर मोरे कॉलनीत शिबिर घेण्यात आले.
चौकट
पेन्शन मंजुरी
संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून या परिसरातील ८ नागरिकांना विविध पेन्शन मंजूर झाल्या आहेत. त्यांना समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.