कासेगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:26 IST2021-05-12T04:26:46+5:302021-05-12T04:26:46+5:30

कासेगाव (ता. वाळवा) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अमर माने, वाय. ...

Response to blood donation camp in Kasegaon | कासेगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कासेगावात रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कासेगाव (ता. वाळवा) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अमर माने, वाय. डी. माने, उमेश कांबळे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे वंचित बहुजन आघाडी शाखेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद मिळाला. ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर पार पडले. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास दोन पी.पी.ई कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. सोमनाथ साळुंखे, प्रा. सम्राट शिंदे, डॉ. क्रांती सावंत, अमर माने, वाय. डी. माने, उमेश कांबळे, सुशांत माने उपस्थित होते.

Web Title: Response to blood donation camp in Kasegaon