‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद
By Admin | Updated: January 1, 2015 00:03 IST2014-12-31T22:49:25+5:302015-01-01T00:03:23+5:30
जुना कुपवाड रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकात ‘डी युवा शक्ती’ संघटनेतर्फे

‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमास प्रतिसाद
सांगली : व्यसनांच्या मायाजालापासून युवकांना परावृत्त करण्यासाठी शहरात आज (बुधवारी) ‘दारू नको, दूध प्या’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जुना कुपवाड रस्त्यावरील अहिल्यादेवी होळकर चौकात ‘डी युवा शक्ती’ संघटनेतर्फे आज ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संघटनेचे अध्यक्ष विनायक रुपनर यांनी केले होते. कार्यक्रमास परिसरातील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली-मिरज रस्त्यावरील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयासमोर पक्षाच्यावतीने चौथ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नागरिकांना दूध पिण्याचे आवाहन करीत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बजाज, संयोजक मनोज भिसे, राहुल पवार, वसुधा कुंभार, आयुब बारगीर उपस्थित होते.
स्टेशन चौकात सोना अलगोंडा पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सामाजिक संघटनांनी युवा पिढीला जागृत करण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी)