सांगली : जिल्ह्यातील ६९६ गावांच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम मंगळवार, दि.१५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. ४२० खुल्या, ८३ अनुसूचित जाती, ५ अनुसूचित जमाती, १८८ नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षण असणार आहे. यापैकी ५० टक्के म्हणजे ३४९ गावांच्या कारभारी महिला असणार आहे. या प्रक्रियेकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांचे, इच्छुकांचे लक्ष लागले आहे.उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंचपद आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरावर कार्यक्रम होईल. प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली तहसीलदार ही प्रक्रिया पार पाडतील.
अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यताजिल्ह्यात यावर्षी आणि पुढील वर्षी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडेल. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकारण जोरदार तापणार आहे. त्यामुळे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खरा रंग येणार आहे. थेट सरपंच निवड होणार असल्याने इच्छुकांचे लक्ष लागले आहे. परंतु, फेरआरक्षण सोडतीमुळे अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.
६९६ गावांच्या सरपंचांचे असे असणार आरक्षणतालुका / ग्रामपंचायत संख्या / अनु.जाती / अनु.जमाती / ना.मा.प्र / खुलेमिरज ६४ /९ /१ /१७ /३७तासगाव ६८ /७ /० /१८ /४३कवठेमहांकाळ ५९ /८ /० /१६ /३५जत ११६ /१४ /१ /३१ /७०खानापूर ६४ /९ /१ /१७ /३७आटपाडी ५३ /६ /० /१४ /३३कडेगाव ५४ /६ /१ /१५ /३२पलूस ३३ /४ /० /९ /२०वाळवा ९४ /११ /१ /२६ /५६शिराळा ९१ /९ /० /२५ /५७एकूण ६९६ /८३ /५ /१८८ /४२०