शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Sangli: आटपाडीत ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा, अत्यावश्यक सेवा वगळता व्यवहार बंद 

By संतोष भिसे | Updated: December 14, 2023 18:04 IST

भुजबळ, पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

आटपाडी : ओबीसी आरक्षण बचावासाठी आटपाडी तालुक्यामध्ये कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. या मोर्चावेळी आटपाडी शहरातील व्यापाऱ्यांनी लाक्षणिक बंद पाळत ओबीसी आरक्षण बचावला समर्थन दिले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.गुरुवारी आटपाडी बसस्थानकापासून सुरू झालेला मोर्चा मुख्य व्यापारी पेठेतून पुढे नगरपंचायतमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी नगरपंचायतजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यु. टी. जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, यल्लाप्पा पवार, दत्ता पुकळे, प्रवीण सूर्यवंशी, सुमन नागणे, स्नेहजित पोतदार, पंढरीनाथ नागणे, दादासाहेब मोटे, आबा सागर, रणजित ऐवळे आदींची भाषणे झाली.यावेळी वक्त्यांनी मराठा आरक्षणास ओबीसींचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही आमच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी एकत्र आलो आहोत. कोणाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी नाही. इंदापूर येथे आमदार पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याच्या घटनेच्या निषेध व ओबीसी आरक्षण बचाव यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. काही समाजकंटक वेगळी भाषा बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आळा घालणे गरजेचे आहे. काही समाजकंटकांनी बंदला विरोध दर्शवत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी तहसीलदार सागर ढवळे, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन देत मोर्चाची सांगता झाली.

भुजबळ, पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेकमोर्चा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचावाचे नेते मंत्री छगन भुजबळ व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी ओबीसी आरक्षण बचावाच्या घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :SangliसांगलीOBC Reservationओबीसी आरक्षण