कुपवाडमध्ये पथदिव्यांंची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:06+5:302021-07-03T04:18:06+5:30
कुपवाड : शहरासह उपनगरातील शेकडो पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. या खराब पथदिव्यांची येत्या आठवड्यात महापालिकेने दुरुस्ती ...

कुपवाडमध्ये पथदिव्यांंची दुरुस्ती करा
कुपवाड : शहरासह उपनगरातील शेकडो पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. या खराब पथदिव्यांची येत्या आठवड्यात महापालिकेने दुरुस्ती करावी. मागणी मान्य न झाल्यास कुपवाड शहर भाजपतर्फे प्रभाग समिती क्र. ३ च्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कुपवाड शहरासह उपनगरातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आहेत. अहिल्यानगर, रामकृष्णनगर परिसरातील पथदिवे बंद अवस्थेत आहेत. याबाबत विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना दिल्या. तसेच तक्रार वहीमध्ये नोंद करूनसुध्दा दखल घेतली जात नाही. कधी मटेरियल शिल्लक नाही, तर कधी कर्मचारी उपलब्ध नाहीत, अशी कारणे सांगून पथदिव्यांच्या दुरूस्तीस टाळाटाळ करीत आहेत.
याप्रकरणी येत्या आठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर प्रभाग समिती क्र. ३ च्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सदामते यांनी दिला आहे.