सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरुस्त करा, धनगर समाजाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:45 IST2021-04-06T11:44:05+5:302021-04-06T11:45:21+5:30
Muncipalty Sangli- सांगली शहरातील शिंदे मळा प्रभाग क्रमांक ९ मधील अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरवस्था झाली आहे, हा चौक दुरुस्त करा असे निवेदन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे तानाजी होनमाने यांनी केले आहे. हा चौक लवकर सुशोभित न झाल्यास चौकात उपोषण करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

सांगलीतील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभिकरण करा या मागणीचे निवेदन तानाजी व्हनमाने यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे दिले आहे. (छाया : सुरेन्द्र दुपटे)
संजयनगर/ सांगली :शहरातील शिंदे मळा प्रभाग क्रमांक ९ मधील अहिल्यादेवी होळकर चौकाची दुरवस्था झाली आहे, हा चौक दुरुस्त करा असे निवेदन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे तानाजी होनमाने यांनी केले आहे. हा चौक लवकर सुशोभित न झाल्यास चौकात उपोषण करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
शिंदे मळ्याजवळील प्रभाग क्रमांक ९ मधील अहिल्यादेवी होळकर चौक हा सांगली शहरांमध्ये सर्वात मोठा चौक आहे. या चौकाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या बांधकामाला तडे गेले आहेत. अनेक वेळा महापालिकेत निवेदन देऊनही हा चौक दुरुस्त केला जात नाही.
याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आला आहे. तानाजी होनमाने यांच्या नेतृत्वाखाली यासाठी महापालिकेत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सुखदेव काळे, सुनिता मदने, विकास हाके, अमोल आटपाड, सागर कोळेकर आदी उपस्थित होते