रेमडेसिविरची मागणी दररोज ७०० कुप्यांची, उपलब्ध फक्त २७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:03+5:302021-04-24T04:26:03+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक वाढेल तसा जीवनावश्यक अैाषधांचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. शुक्रवारी रेमडेसिविर इंजेक्शन्स फक्त २७ ...

Remandesivir demand 700 coupons per day, only 27 available | रेमडेसिविरची मागणी दररोज ७०० कुप्यांची, उपलब्ध फक्त २७

रेमडेसिविरची मागणी दररोज ७०० कुप्यांची, उपलब्ध फक्त २७

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक वाढेल तसा जीवनावश्यक अैाषधांचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. शुक्रवारी रेमडेसिविर इंजेक्शन्स फक्त २७ उपलब्ध होती, मागणी मात्र ७०० हून अधिक इंजेक्शन्सची आहे. फेविपिरॅव्हीर गोळ्यांची स्थितीदेखील चिंताजनक आहे. १० हजारची मागणी असताना, फक्त हजारभर पॅकेट्‌स गोळ्या उपलब्ध आहेत.

कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिविर व फेविपिरॅव्हीर गोळ्या जीवनदायी ठरत आहेत. या स्थितीत रुग्णांचे नातेवाईक खिशात नोटांची बंडले घेऊन औषध दुकानांत हेलपाटे मारत आहेत. वाट्टेल तितके पैसे घ्या, पण इंजेक्शन द्या, असे केविलवाणे आर्जव ऐकायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे या दोहोंचे नियंत्रण आहे. तेथील अधिकाऱ्यांचे फोन अखंड खणखणत आहेत. एरवी औषधांसाठी ग्राहक कधीच अन्न व औषध कार्यालयात येत नाहीत, पण रेमडेसिविरसाठी चक्क कार्यालयात गर्दी होत असल्याचा दुर्दैवी अनुभव अधिकारी घेत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन शंभर टक्के प्राणदायी नाही, त्यामुळे त्याचा अट्टाहास धरू नये, असे कोरोना टास्क फोर्सचे डॉक्टर वारंवार सांगत आहेत, पण खासगी कोविड सेंटरमधील डॉक्टर्स इंजेक्शनसाठी चिठ्ठ्या देत असल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

कोट

रेमडेसिविर जीवनरक्षक नाही

कोरोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रेमडेसिविरचा वापर टास्क फोर्सच्या सूचनांनुसार करणे गरजेचे आहे. रेमडेसिविर जीवनरक्षक औषध नाही. त्याच्या वापराने रुग्ण बरा होतो, अन्यथा बरा होतही नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सरसकटपणे रेमडेसिविरचा अतिरिक्त वापर होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

कोट

रेमडेसिविरसाठी डॉक्टरांवर दबाव टाकू नका

रेमडेसिविर दिले म्हणजे रुग्णाचा प्राण निश्चितपणे वाचेल, असा गैरसमज पसरला आहे. त्यामुळे प्रत्येक कोविड रुग्णासाठी नातेवाईक त्याचा आग्रह धरत आहेत. पण रेमडेसिविर म्हणजे जीवनरक्षक औषध नाही. त्याची रुग्णाला गरज आहे किंवा नाही हे डॉक्टरांना ठरवूद्या. रेमडेसिविरचेही साईड इफेक्ट आहेत. गरज नसताना त्रास होतो, त्यामुळे नाहक आग्रह धरू नये.

- डॉ. अविनाश झळके, कोविड सेंटरमधील डॉक्टर

कोट

डॉक्टरांनी चिठ्ठी दिल्याने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी बरीच पळापळ केली, पण मिळाले नाही. जादा पैशांचीही तयारी ठेवली. औषध दुकानात ते उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांनाच उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यातून चार इंजेक्शन्स कशीबशी उपलब्ध झाली. अन्य औषधांसाठी मात्र धावाधाव करावी लागलेली नाही. ऑक्सिजनचीही टंचाई नाही.

- श्रीकांत पाटील, रुग्णाचे नातेवाईक

कोट

आठवडाभरापूर्वी भावाला कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. पहिल्या दोन-तीन दिवसांत डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शन आणण्याची सूचना केली होती. त्यासाठी बरीच पळापळ केली. त्यातून दोन इंजेक्शन्स कशीबशी मिळाली. पण त्यानंतर प्रकृती स्थिरावल्याने गरज भासली नाही. तथापि, इंजेक्शनसाठी झालेली धावपळ बरीच त्रासदायक ठरली.

- रवींद्र कौलापुरे, रुग्णाचे नातेवाईक

कोट

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आग्रह धरू नका, असे अधिकारी सांगताहेत. पण रुग्णालयातून मात्र डॉक्टर इंजेक्शनसाठी चिठ्ठी देतात. अशावेळी आमची कोंडी होती. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी इंजेक्शन आणून द्यावेच लागते. चार दिवसांपासून इंजेक्शनसाठी प्रयत्न केले, पण न मिळाल्याने नाईलाज झाला. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

- पद्मावती उगारे, रुग्णाचे नातेवाईक

कोट

कोविड सेंटरमधील औषध दुकानात इंजेक्शन शिल्लक नव्हते, त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, पण त्यांच्याकडेही टंचाई असल्याचे कळाले. रुग्ण अजून उपचारामध्येच आहे. इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती डॉक्टरांना दिली आहे.

- विशाल चव्हाण, रुग्णाचे नातेवाईक

पॉईंटर्स

कोरोनाचे एकूण रुग्ण - ६५,५५७

सध्या उपचार सुरू असलेले - ९,७७८

चौकट

पुरेसा पुरवठाच नाही

- फेव्हिपिरॅव्हीर - दररोज मागणी ५०००, पुरवठा १०००

- रेमडेसिविर व्हायल - दररोज मागणी ७००, पुरवठा ३०

- डॉसिलीझुमॅप व्हायल - मागणी - १००, पुरवठा ०

Web Title: Remandesivir demand 700 coupons per day, only 27 available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.