सांगलीत गॅसवाहिनीच्या नोंदणीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:45+5:302020-12-13T04:39:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाच्या भारत गॅस रिसोर्सेस लि. कंपनीतर्फे सांगली व सातारा जिल्ह्यातील नॅचरल गॅस वाहिनीसाठी ...

सांगलीत गॅसवाहिनीच्या नोंदणीस सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र शासनाच्या भारत गॅस रिसोर्सेस लि. कंपनीतर्फे सांगली व सातारा जिल्ह्यातील नॅचरल गॅस वाहिनीसाठी कनेक्शनची योजना राबविण्यात येत आहे. याचे उद्घाटन शनिवारी सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आले.
या गॅसचा वापर प्रामुख्याने घरगुती तसेच गॅस पंप या ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्र. ८,९,१०,१७ व १९ येथे पाईप गॅसची नोंदणी सुरू आहे. गणपती मंदिराशेजारी विश्रामबाग येथे आमदार गाडगीळ यांच्याहस्ते याचा प्रारंभ झाला. यावेळी गाडगीळ म्हणाले की, या गॅस प्रकल्पामुळे नागरिकांना पाईपलाईनद्वारे घरपोच गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. हा गॅस सुरक्षित, स्वच्छ, स्वस्त व पर्यावरणपूरक इंधन आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता सांगलीत मूर्तस्वरूप मिळाले आहे. सध्या होणारी या इंधनपुरवठ्याची ओढाताण यामुळे वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे.
यामुळे संबंधित वाॅर्डातील जास्तीत-जास्त नागरिकांनी पाईप नॅचरल गॅसची नोंदणी करण्याचे आवाहन गाडगीळ यांनी केले.
यावेळी भाजपचे शेखर इनामदार, नगरसेवक संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी तसेच भारत गॅस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.