शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 11:42 IST

कर्जदाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे कारवाई

तासगाव : पाच लाखाच्या मुद्दलाच्या बदल्यात चाळीस लाख रुपयाचा मोबदला घेऊन आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे महात्माजी निवृत्ती निकम (वय ५५, रा. हातनोली) यांनी सहा डिसेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.आठ दिवसानंतर त्यांची तब्येत ठिक झाल्यावर त्यांनी खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कृषी विभागात कृषी सहायक म्हणून कार्यरत असणारी श्रद्धा शिवाजी जाधव आणि तिचा पती शिवाजी नारायण जाधव ( रा. हातनोली) यांच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महात्माजी निवृत्ती निकम यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय निमित्त पाच लाख रुपयांची रोख रक्कम श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव यांच्याकडून घेतली होती. या दोघांनी २० टक्के दरमहा सावकारी व चक्रवाढ व्याजाने आकारणी करून पाच लाखाच्या मोबदल्यात ४० लाख रुपये परत घेतले. त्यानंतर आणखी एक कोटी २० लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी सातत्याने तगादा लावला. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. या गोष्टीला कंटाळून महात्माजी निकम यांनी सहा डिसेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर आठ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी याबाबत तासगाव पोलिसात खासगी सावकारकी आणि आत्महत्येस प्रवृत्त गेल्याप्रकरणी, श्रद्धा जाधव आणि शिवाजी जाधव या पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. श्रद्धा जाधव ही तासगाव कृषी विभागाकडे कवठे एकंद येथे कृषी सहायक म्हणून कार्यरत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस