दिवसात विक्रमी ३६ हजार जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:23+5:302021-07-03T04:18:23+5:30
सांगली : जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी म्हणजे ३६ हजार ७३४ जणांचे लसीकरण झाले. गुरुवारी रात्री उशिरा ५८ हजार डोस मिळाल्यानंतर ...

दिवसात विक्रमी ३६ हजार जणांचे लसीकरण
सांगली : जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी म्हणजे ३६ हजार ७३४ जणांचे लसीकरण झाले. गुरुवारी रात्री उशिरा ५८ हजार डोस मिळाल्यानंतर शुक्रवारी पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू झाले. सुमारे २२५ केंद्रांवर लस देण्याचे काम सुरू होते. महापालिकेला ८ हजार डोस देण्यात आले होते. प्रतीक्षा यादीतील अनेकांना आज लस मिळाली. अद्याप सुमारे २२ हजार डोस शिल्लक आहेत, त्यामुळे शनिवारीदेखील पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरू राहणार आहे. आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात उपकेंद्रांमध्येदेखील लसीकरणाची सोय केली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले आहे, शिवाय १८ ते ३० वर्षांच्या तरुणांनाही लस दिली जात आहे. आजवरचे एकूण लसीकरण ८ लाख ६६ हजारहून अधिक झाले आहे.