केदारवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:49+5:302020-12-06T04:27:49+5:30

नेर्ले : केदारवाडी (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व असंघटित बांधकाम कामगारांना पुस्तक वाटप प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात ...

Reception of meritorious students in Kedarwadi | केदारवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

केदारवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नेर्ले : केदारवाडी (ता. वाळवा) येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व असंघटित बांधकाम कामगारांना पुस्तक वाटप प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय पाटील यांचा सत्कार तसेच पोलीस बॉईज संघटनेच्या वाळवा तालुका अध्यक्षपदी शुभम पाटील व उपाध्यक्षपदी सागर माने यांची निवड झाल्याबद्दल व विक्रम धुमाळ यांची असंघटित बांधकाम कामगार वाळवा तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराज पाटील होते. कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदुराव माने, हणमंत देसाई, भीमराव माने, विलास कदम, सीताराम कदम, प्रशांत माने, किरण माने, अशोक माने, जयसिंग बर्गे उपस्थित होते. विलास कदम यांनी प्रास्ताविक केले. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत माने यांनी आभार मानले.

फोटो-०५नेर्ले०१

फोटो ओळ : केदारवाडी (ता. वाळवा) येथे प्रतीक पाटील यांच्याहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Reception of meritorious students in Kedarwadi