शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: बंडखोर जयश्री पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये नकोच, पृथ्वीराज पाटील यांची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:23 IST

बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव

सांगली : येथील विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. म्हणून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेऊ नये, अशी भूमिका काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईतील बैठकीत काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक सोमवारी मुंबईत घेतली. यामध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाली, अशा उमेदवारांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांना पक्षात पुन्हा थारा देऊ नये, अशी आग्रही भूमिका राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षांनी मांडली. यावेळी पृथ्वीराज पाटील बोलत होते.पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्री पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. भाजपच्या फायद्यासाठी त्यांनी मुद्दाम निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा घेऊ नये, अशी आग्रही भूमिका बैठकीत मांडली आहे. तसेच काँग्रेस बंडखोर उमेदवाराच्या बाजूने उभे राहिलेले काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावावर माजी प्रांताध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. याबद्दल खेद व्यक्त केला. पक्ष हितासाठी या बंडखोर समर्थकांवर कारवाई झाली पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.

बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्तावबंडखोर उमेदवारांच्या प्रचारातील माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. ती कारवाई का झाली नाही, असा सवाल पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित केला. त्याबाबत माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच खुलासा करू शकतील, अशी भूमिका घेत हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. तुम्ही काँग्रेसची नव्याने बांधणी करणार असाल तर खंबीरपणे निर्णय घ्यावे लागतील, सांगलीबाबत तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न थेट त्यांना विचारण्यात आला. त्यावर सपकाळ यांनी सांगलीतील बंडखोर समर्थकांबद्दल कारवाईचा नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस