शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील सांगतील तिथे यायला तयार, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:13 IST

हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात पुन्हा टीका

कवठेमहांकाळ/ ढालगाव : कोणाच्याही धमक्यांना मी घाबरणार नाही. जयंत पाटील यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे, तिथे मी येण्यास तयार आहे, असे आव्हान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे हिंदू बहुजन दसरा मेळावा पार पडला. यावेळी पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. ते म्हणाले, इस्लामपूरचे ईश्वरपूर होऊ नये, अशी जयंत पाटील यांची इच्छा होती. त्यांच्या धमक्यांना मी घाबरणार नाही.ते म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला राजकीय आरक्षण वगळून फक्त शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे. असे झाले तर मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद मिटेल. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नसून ते दाखले बनावट असतील तर आमचा त्याला विरोध आहे. महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. त्यासाठी माझी भूमिका ठाम आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मी समाजाच्या बरोबर आहे. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा विषय असेल, तेव्हा मी सरकारसोबत आहे.मेळाव्यात प्रा. नितीन सावगावे, सरपंच रमेश कोळेकर, यू. टी. जाधव, संदीप गिड्डे, शिवानंद स्वामी हैबतपुरे, दौलत शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रह्मानंद पडळकर, मिलिंद कोरे, सुभाष खांडेकर, काशिलिंग कोळेकर, राहुल कोळेकर, रामचंद्र पाटील, मनोज कोळेकर उपस्थित होते.विरोधक एकवटले, पण भाजप नेते सोबतभाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सर्व राज्यातील विरोधी नेते एकटवले आहेत. मात्र, भाजपचे सर्व नेते गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Padalkar challenges Jayant Patil: Ready to come wherever you say.

Web Summary : Gopichand Padalkar challenges Jayant Patil, daring him to choose a time and place. He also advocated for Maratha reservation in education and jobs, excluding political reservations. Padalkar affirmed his support for the Dhangar community's ST caste certificate demands, and stands with Fadnavis.