जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ; ११७४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:43+5:302021-07-07T04:32:43+5:30

रविवारी आठशेवर आलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ३, मिरज २, वाळवा, पलूस ...

Re-emergence of corona patients in the district; 1174 new patients | जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ; ११७४ नवे रुग्ण

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ; ११७४ नवे रुग्ण

रविवारी आठशेवर आलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली. जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ३, मिरज २, वाळवा, पलूस प्रत्येकी ३, खानापूर, तासगाव, शिराळा आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, तर जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

सोमवारी चाचण्यांचे प्रमाण वाढत आरटीपीसीआर अंतर्गत ३२६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३६७ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ९७१२ जणांच्या नमुने तपासणीतून ८२४ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली असून सध्या ९ हजार ९६१ जण उपचार घेत आहेत. त्यातील १०४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८८३ जण ऑक्सिजनवर, तर १५८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला, तर १७ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकाेसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होत एक नवीन रुग्ण आढळला, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १५०९३६

उपचार घेत असलेले ९९६१

कोरोनामुक्त झालेले १३६८१४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४१६२

पॉझिटिव्हीटी रेट ९.१७

सोमवारी दिवसभरात

सांगली ९४

मिरज २८

आटपाडी ५६

कडेगाव ११२

खानापूर १०७

पलूस ९३

तासगाव १०२

जत ५७

कवठेमहांकाळ ६९

मिरज तालुका १२९

शिराळा ९३

वाळवा २३४

Web Title: Re-emergence of corona patients in the district; 1174 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.