फुटबॉल स्पर्धेत आरसीए संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:33 IST2021-02-25T04:33:11+5:302021-02-25T04:33:11+5:30

ओळ : मिरज येथे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयाेजित कनिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत मिरजेच्या आरसीए संघाने विजेतेपद पटकावले. मिरज : ...

RCA team winners in football | फुटबॉल स्पर्धेत आरसीए संघ विजेता

फुटबॉल स्पर्धेत आरसीए संघ विजेता

ओळ :

मिरज येथे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयाेजित कनिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत मिरजेच्या आरसीए संघाने विजेतेपद पटकावले.

मिरज : सांगली जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयाेजित कनिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मिरजेच्या आरसीए संघाने गोगा फुटबॉल संघावर दोन गोलने विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

मिरजेत कनिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आरसीए संघाने मिरज सिटी फुटबॉल संघाचा व दुसऱ्या उपांत्य सामन्यात गोगा फुटबॉल संघाने केएफसी संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मिरजेच्या आरसीए संघाने गोगा फुटबॉल संघावर दोन गोलने विजय मिळवला. विजेत्या संघांस रेल्वेचे सहायक अभियंता श्रवणकुमार भिल्ल, मुसा जमादार, प्रा. संजय पाटील यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत माने, सचिव अतिष अग्रवाल, हारुण खतीब, रफीक खतीब, शब्बीर शेख, राजू कांबळे, मुन्ना नाईकवडी, श्वेतपद्म कांबळे, भूपाल साबळे यांच्यासह फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते. अबीद शेख, फहिम शेख यांनी संयोजन केले.

Web Title: RCA team winners in football