शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Sangli: मांजर्डेत एमडी ड्रग्जचा ११.३७ लाखांचा कच्चा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:58 IST

गुन्हे अन्वेषणसह तासगाव पोलिसांची संशयिताच्या घरावर छापा टाकून कारवाई

मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथील दत्तनगर परिसरातील रस्त्यालगत असलेले पत्र्याच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनविणयासाठी लागणारा ११ लाख ३७ हजार रुपये किमतीचा कच्चा माल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे बनवण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्जसाठी मांजर्डेतून कच्चा माल पुरवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी प्रसाद बाळासाहेब मोहिते (रा. मांजर्डे) याला अटक केली होती. रविवारी त्याच्याच घरातून कच्चा माल जप्त केला.स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि तासगाव पोलिस यांना इरळी येथे जप्त केलेल्या एमडी ड्रग्जचे मांजर्डेत कनेक्शन असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी मांजर्डे येथील दत्तनगर परिसरात संशयित प्रसाद मोहिते याचे वडील बाळासाहेब रंगराव मोहिते यांच्या गट नंबर ३५६/ब रानात असलेल्या घरावर छापा टाकला.घराच्या मागे असलेल्या शेडमध्ये पोलिसांना क्लोरोफॉर्म व ॲसिड असलेले बॅरेल मिळून आले. क्लोरोफॉर्मचे १५ बॅरेल व ॲसिडचे १२ कॅन सापडले. एकूण ११ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एमडी ड्रग्ज बनविण्यासाठीचा हा कच्चा माल मांजर्डे येथून इरळी येथील कारखान्यात पाठविला जात होता. इरळी येथे एमडी ड्रग बनविल्यानंतर ते राज्यात इतरत्र पाठवले जात होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर टिंगरे, सहायक फौजदार मुलाणी, बिरोबा नरळे, अमोल ऐदाळे, बाबासाहेब मदने, दरिबा बंडगर, अविनाश घोरपडे, नायब तहसीलदार धनश्री स्वामी, ड्रग्ज निरीक्षक राहुल कारंडे, प्रा. अनिल पोवार, संदीप गुरव, प्रदीप पाटील, लहू जाधव आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांना चकवलेमुंबई पोलिसांनी यापूर्वीच एमडी ड्रग्ज प्रकरणात मांजर्डे येथील प्रसाद मोहिते याला अटक केली आहे. त्याच्या घराजवळील शेडमध्ये कच्चा माल बनवून तो इरळीला पाठवला जात होता. मुंबई पोलिसांना हे कनेक्शन प्रसादला अटक करूनही लक्षात आले नाही. त्यांनी केवळ इरळीत कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर सांगली पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली होती. अखेर सांगली पोलिसांनी बाजी मारत मुंबई पोलिसांना धक्का देत पर्दाफाश केला. पोलिसांनी घरावर गुप्त पाळत ठेवत हे प्रकरण उघड केले आहे.

संशयित नातेवाईकप्रसाद मोहितेला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर इरळीत छापा मारला. त्यानंतर इरळीतील मुख्य सूत्रधार प्रवीण शिंदे (रा. बलगवडे) याला अटक केली. प्रसाद मोहिते हा प्रवीण शिंदे याचा मेहुणा आहे.

द्राक्षबागेचे औषध सांगितलेमुंबई पोलिसांच्या ताब्यातील प्रसाद मोहितेच्या घराजवळील शेडवर छापा मारुन त्याच्या वडिलांकडे पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा प्रसादने त्यांना द्राक्षबागेसाठीच्या औषधाचा साठा शेडमध्ये ठेवल्याचे त्यांना सांगितले , अशी माहिती मिळाली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस