शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यात नाही सीमावाद, घेतो दोन्ही राज्यांचे लाभ; सीमाभागातील ८८०० कुटुंबांकडे दोन शिधापत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 14:12 IST

दोन्ही राज्यांकडून ते धान्य, मतदान, शेतीसाठी पाणीपुरवठ्याचा घेतात लाभ

सांगली : जिल्ह्याच्या सीमाभागातील ८ हजार ८०० कुटुंबांकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या शिधापत्रिका असल्याचे आढळले आहे. दोन्ही राज्यांकडून ते रेशनिंगचे धान्य घेत आहेत. या कुटुंबांनी कर्नाटकात किंवा महाराष्ट्रात एकाच ठिकाणी धान्य घ्यावे अशी सूचना पुरवठा विभागाने केली आहे.दोन्ही राज्यांत सीमावाद जोरात सुरु असला, तरी या कुटुंबांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. दोन्ही राज्यांकडून ते धान्याचा लाभ घेतात. मतदानही दोन्ही राज्यांत करतात. शेतीसाठी पाणीपुरवठा दोन्ही राज्यांकडून घेतात. सवलतीच्या दरातील खते, कृषी योजनांचा लाभही मिळतो.घर सीमेच्या अलिकडे आणि शेती पलीकडे असल्याचा फायदा त्यांना मिळतो. अशा कुटुंबांचा शोध पुरवठा विभाग घेत आहे. गेल्या काही वर्षांत दुहेरी शिधापत्रिका रद्द करुन कित्येक टन धान्याची बचत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतर केलेल्या कुटुंबांकडेही दुहेरी शिधापत्रिका आहेत. त्यांचा तपासही नियमितपणे सुरु असतो. जिल्ह्यात पूर्व भागातील जत, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांत सर्वाधिक दुहेरी शिधापत्रिका आहेत. शिराळ्यात अत्यल्प आहेत.

आधार लिंकिंगमुळे सापडली फसवी कुटुंबेरेशनवरील धान्याचे वितरण आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे. देशात कोठेही धान्य घेतले, तरी त्याची नोंद शासनाकडे होते. एका महिन्याचे धान्य घेतल्यानंतर पुन्हा पुढील महिन्यापर्यंत मिळत नाही. सीमाभागातील कुटुंबे महाराष्ट्रातील दुकानात गहू-तांदूळ घेतल्यावर कर्नाटकातील दुकानातही शिधापत्रिका घेऊन जायची. शिधापत्रिका आधार कार्डसोबत लिंक केल्याने ती पकडली गेली.

जिल्ह्याच्या पूर्व भागात दुबार शिधापत्रिका असणारी कुटुंबे मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी कोठेतरी एकाच ठिकाणी धान्य घ्यावे असा पर्याय दिला आहे. पुरवठा निरिक्षकांकडूनही अशा कुटुंबांचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाकडून माहिती दिली जाते. या कुटुंबांना दोहोंपैकी एक शिधापत्रिका रद्द करावी लागेल. शोधमोहिमेत आतापर्यंत ८८०० दुबार शिधापत्रिका सापडल्या आहेत. - शिल्पा ओसवाल, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक