राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान लोकचळवळ होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST2021-02-19T04:16:13+5:302021-02-19T04:16:13+5:30
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत आरळा, ता. शिराळा येथे कार्यशाळेत बाळासाहेब नायकवडी बोलत होते. अध्यक्षपदी आरळाचे सरपंच आनंदा कांबळे होते. नायकवडी ...

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान लोकचळवळ होणे गरजेचे
राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत आरळा, ता. शिराळा येथे कार्यशाळेत बाळासाहेब नायकवडी बोलत होते. अध्यक्षपदी आरळाचे सरपंच आनंदा कांबळे होते. नायकवडी म्हणाले की, महात्मा गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याची बिजे आज पाहायला मिळत आहेत. त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून न्यायदान मंडळ स्थापन करून आमच्या गावात आम्हीच सरकार ही संकल्पना राबवली होती. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी ग्रामस्वराज्य अभियान लोकचळवळ म्हणून राबवावी, तरच गावाचा कायापालट होईल.
केंद्र प्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी स्वागत केले. नाठवडेचे केंद्र प्रमुख आलिषा मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. मणदूरचे ग्रामसेवक एम. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आरळा ग्रामसेवक प्रवीण कांबळे, सोनवडेचे गणेश पेठकर, गुढेच्या यशोदा कुंभार, काळुंद्रेचे संतोष साठे यांच्यासह सोनवडे, आरळा, मणदूर, करूंगली, काळुंद्रे, गुढे, मराठेवाडी, खुंदलापूर या गावांतील सरपंच, सदस्य, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, मुख्याध्यापक उपस्थित होते.