शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

दुष्काळी मदतीवर ‘आरएसएस’ची पोळी, विलिंग्डन महाविद्यालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 15:05 IST

दान सत्पात्री असावे, असे म्हटले जाते, मात्र काहीजण स्वत:च्या नावाचा ढोल बडवण्यासाठी दानधर्माच्या नावाने जोगवा मागत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापुढे पाऊल टाकत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी चक्क संघाच्या नावाचे पत्रक काढून दुष्काळी मदत गोळा करण्याचा फतवा काढला आहे. संघाच्या जनकल्याण समितीची पावती पुस्तके प्रत्येकाच्या माथी मारली आहेत.

ठळक मुद्देदुष्काळी मदतीवर ‘आरएसएस’ची पोळी, विलिंग्डन महाविद्यालयातील प्रकार संघाची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती

सांगली : दान सत्पात्री असावे, असे म्हटले जाते, मात्र काहीजण स्वत:च्या नावाचा ढोल बडवण्यासाठी दानधर्माच्या नावाने जोगवा मागत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापुढे पाऊल टाकत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी चक्क संघाच्या नावाचे पत्रक काढून दुष्काळी मदत गोळा करण्याचा फतवा काढला आहे. संघाच्या जनकल्याण समितीची पावती पुस्तके प्रत्येकाच्या माथी मारली आहेत.काही कर्मचाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, दुष्काळी निधी गोळा करण्यास कोणाचीही हरकत नाही. चांगले कार्य असले तरी त्यातून एखाद्या संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीचा गाजावाजा का केला जात आहे? संघटनेच्या नावाने मदतीची पत्रके उघडपणे वाटून सक्ती केली जात आहे. महाविद्यालयाच्या स्तरावरही मदत गोळा करता आली असती. यातून महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखी भर पडली असती.

महाविद्यालयाच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गाजावाजा का केला जात आहे? संस्थेबाहेरच्या एखाद्या संस्था-संघटनेकडून येथे निधी संकलन करता येऊ शकत असले तरी त्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय स्तरावरून फतव्यासारखे आदेश का दिले जात आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता हात-पाय पसरण्यास सुरुवात केली असून जनकल्याण समितीच्या सामाजिक कार्यातून त्यांना त्यांची नवी ओळख निर्माण करावयाची आहे. त्यासाठी त्यांनी ओळखीच्या व संघविचाराच्या संस्था निवडण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळी निधीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची धडपड सुरू केली आहे.

या गोष्टी आता संबंधित संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खटकत आहेत. त्यांना फतव्याचे स्वरुप दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगली जिल्ह्यात अशा माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, मात्र तो अनेकांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. प्राध्यापकांच्या एका संघटनेमार्फत याला विरोधाची तयारी सुरू झाली आहे.हे अतिक्रमणच!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या बैठकीत उपस्थित राहून उद्दिष्टपूर्तीची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे हे एक प्रकारचे बाह्यसंघटनेचे अतिक्रमणच असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.प्राचार्यांचा इन्कारमहाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी असे काही घडले नाही, इतकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. याविषयी मी नंतर बोलेन, असे सांगून त्यांनी दूरध्वनी बंद केला.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSangliसांगली