शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

कडक उन्हामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट, सांगली जिल्ह्यात १० पाझर तलाव पडले कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:22 IST

शिराळा : शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव ...

शिराळा : शिराळा तालुक्यात तापमानात झालेल्या वाढीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. यामुळे ४९ पैकी १० पाझर तलाव कोरडे पडले आहेत; त्यामुळे या परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.करमाळे नंबर १ व पाचुंब्री तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ४७ तलावांपैकी हत्तेगाव येथील तलावात ९५ टक्के पाणीसाठा असून, १० तलावांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. २ तलावांत ९०, एका तलावात ८५, तर ३ तलावांत ५० टक्के पाणीसाठा आहे.उन्हाची दाहकता वाढू लागल्याने धरण, विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत घट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढू लागली आहे. मार्चअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणीपातळी घटणार असून पाणीटंचाईची समस्या भेडसावणार आहे.तलावाचे नाव व कंसात पाणीसाठा : टक्केवारी अशीहत्तेगाव (९५), प.त. शिराळा नंबर १, पाडळी (९०), खिरवडे (८५), भटवाडी, वाडीभागाई बिऊर (७५), वाकुर्डे बुद्रुक जमदाड कुरण, बादेवादी वाकुर्डे बुद्रुक, अंत्री खुर्द, निगडी महारदरा, कापरी, तडवळे नंबर १ (७० ), गवळेवाडी उंदीर खोरा, गवळेवाडी बहिरखोरा, वाकुर्डे खुर्द, पाडळेवाडी (६५), औंढी (५५ ),शिरसटवाडी, खेड, रेड क्रमांक २ (५०), मेणी (सांकृबी नाला, बेलदारवाडी, तडवळे वाडदरा (४५), येळापूर (चव्हाणवाडी), करमाळे नंबर २ (४०), आटुगडेवाडी (मेणी), धामवडे (कुंडनाला), लादेवाडी (३५), कोंडाईवाडी नंबर १ व २, शिरशी (कासारकी), प. त. शिराळा, नंबर २,पावलेवाडी नंबर १ व २ (२५), पाचुंब्री (२०), चरणवाडी नंबर १, भाटशिरगाव (१५).कोरडे पडलेले पाझर तलावसावंतवाडी, शिरशी नंबर १, शिरशी भैरवदरा आणि काळेखिंड, शिवरवाडी, भैरेवाडी, निगडी जुना कासारदरा, निगडी खोखडदरा, करमाळा नंबर १, इंगरूळ हे दहा तलाव कोरडे पडले आहेत.

तापमानवाढीस वातावरणातील बदल कारणीभूत आहेत. त्यामुळे अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात जलाशयातील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन झाल्याने तलावातील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. परिणामी पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. - प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शिराळा

टॅग्स :SangliसांगलीTemperatureतापमानWaterपाणी