शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर सोहळा २२ जानेवारी नव्हे, तर 'या' दिवशी व्हायला हवा होता- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:10 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्ताबाबत आपलं वेगळं मत मांडलं आहे.

Jayant Patil On Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत असल्याचं चित्र आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावरून टोला लगावला आहे. " रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का?" असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

जयंत पाटील यांच्या हस्ते आज इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्रीराम मंदिरात कलश पूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना जयंत पाटील राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे," असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

दर्शनासाठी कधी जाणार?

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून वाद रंगत असताना "मी अयोध्येत दर्शनासाठी आता जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. गर्दी कमी असेल तेव्हा मी नक्की जाणार आहे," असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. "देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे," असंही जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा रामनवमीला हवा होता, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलRam Mandirराम मंदिरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा