शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: केदारवाडीत ९१ लाखांचा रक्तचंदन साठा हस्तगत, दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:10 IST

कासेगाव : केदारवाडी (ता. वाळवा) येथे एका घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेला ९१ लाख रुपये किमतीचा रक्तचंदनाचा साठा कासेगाव पाेलिसांनी ...

कासेगाव : केदारवाडी (ता. वाळवा) येथे एका घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेला ९१ लाख रुपये किमतीचा रक्तचंदनाचा साठा कासेगाव पाेलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी संशयित विजय बाळासाहेब तांबवे (वय ३०, रा. केदारवाडी) व इव्हनेश भैय (पूर्ण नाव नाही) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.केदारवाडी येथील केदारवाडी-काळंमवाडी रस्त्याच्या उत्तरेस गोसावी समाजाच्या वस्तीलगत असणाऱ्या जयकर तुकाराम पाटील यांच्या मालकीच्या घरात संशयित विजय पाटील व इव्हनेश भैय यांनी विक्रीच्या उद्देशाने रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीररीत्या आणल्याची माहिती कासेगाव पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अनिल पाटील, दीपक हांडे, दीपक घस्ते, आनंद देसाई यांना मिळाली. त्यांनी त्वरित सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना कळविले. दीपक जाधव यांनी पोलिस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वनरक्षक एस.टी. वाघमारे, वन विभागाच्या पथकासह रविवारी दुपारी जयकर पाटील यांच्या घरावर छापा टाकला. घटनास्थळी रक्तचंदनाचे एकूण ७५८ किलाे वजनाचे २० लाकडी ओंडके मिळून आले. बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ९१ लाख ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.याप्रकरणी कासेगाव पोलिसांनी संशयित विजय तांबवे व इव्हनेश भैय यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस