राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजकेदार आटुगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:40+5:302021-07-02T04:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी राजकेदार आटुगडे (आष्टा), तर उपाध्यक्षपदी सुशांत कुराडे (सुरुल) यांची निवड ...

Rajkedar Atugade as the President of NCP Students Congress | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजकेदार आटुगडे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजकेदार आटुगडे

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी राजकेदार आटुगडे (आष्टा), तर उपाध्यक्षपदी सुशांत कुराडे (सुरुल) यांची निवड करण्यात आली. युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

तालुका कार्यकारिणीचे नूतन सदस्य- तेजस कदम (कुंडलवाडी), विनायक बेडके (पेठ), प्रतीक नायकल (इस्लामपूर), अनुज कोळेकर (रेठरे हरणाक्ष).

प्रतीक पाटील म्हणाले, विद्यार्थी हा देशाचे भविष्य आहे. या घटकाचेही अनेक प्रश्न आहेत. ते आपण समजावून घेत, सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आम्ही पक्ष म्हणून आपणास पूर्ण सहकार्य करू. नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात फिरून नव्याने सक्रिय कार्यकर्त्यांची तालुका कार्यकारिणी करावी.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संग्राम पाटील, सोशल मीडियाचे प्रदेश सदस्य प्रशांत कदम, तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर, धीरज भोसले उपस्थित होते.

Web Title: Rajkedar Atugade as the President of NCP Students Congress