राजारामबापू दूध संघात आज दुग्धदिन आणि महिला मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:23+5:302021-02-16T04:28:23+5:30

इस्लामपूर : येथील राजारामबापू दूध संघाच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज, मंगळवारी दुग्धदिन आणि महिला मेळाव्याचे आयोजन ...

Rajarambapu Dudh Sangha has a milk day and women's meet today | राजारामबापू दूध संघात आज दुग्धदिन आणि महिला मेळावा

राजारामबापू दूध संघात आज दुग्धदिन आणि महिला मेळावा

इस्लामपूर : येथील राजारामबापू दूध संघाच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज, मंगळवारी दुग्धदिन आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.

यावेळी 'तुझ्यात जीव रंगला' फेम सिनेअभिनेत्री अक्षया देवधर आणि लाडू राजवीरसिंह राजे यांची उपस्थिती असणार आहे. पाटील म्हणाले, संघाच्या कार्यस्थळावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील हे प्रमुख पाहुणे असून, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा नेते प्रतीक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी एक वाजता हा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात वाळवा धनलक्ष्मी दुग्धोत्पादन स्पर्धेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, म्हशीच्या पालकांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. तसेच संघाला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या प्राथमिक दूध संस्था आणि उच्चांकी पशुखाद्य विक्री करणाऱ्या वितरकांचा गौरव केला जाणार आहे. या मेळाव्यास महिलांसह दूध उत्पादक सभासद, शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, संचालक पोपटराव जगताप, रमेश पाटील, अनिल खरात, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी उपस्थित होते.

फोटो-

विनायकराव पाटील

Web Title: Rajarambapu Dudh Sangha has a milk day and women's meet today