वाॅन्लेसमध्ये कोविड बेड वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:01+5:302021-04-23T04:29:01+5:30

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे मिरज शासकीय रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना जागा मिळत नसल्याने उपचाराविना रुग्णांचे ...

Raise covid beds in vans | वाॅन्लेसमध्ये कोविड बेड वाढवा

वाॅन्लेसमध्ये कोविड बेड वाढवा

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे मिरज शासकीय रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालये, कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्णांना जागा मिळत नसल्याने उपचाराविना रुग्णांचे जीव धोक्यात आहेत. यामुळे मिरज-सांगली शहरातील खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या वाढविण्याची गरज आहे. गत वर्षी वाॅन्लेस रुग्णालयात १५० बेडची व्यवस्था होती. मात्र, यावर्षी केवळ ८४ बेडची व्यवस्था आहे. वाॅन्लेसमध्ये कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या अडचणी जिल्हा प्रशासनाने दूर केल्यास येथे मोठ्या संख्येचे कोविड रुग्णांसाठी आणखी खाटा उपलब्ध करता येणे शक्य असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अ‍ॅड. ए. ए. काझी, संतोष माने, शंकर परदेशी, सचिन गाडवे, राकेश तामगावे, झोहेब मुल्ला, बाळासाहेब पाटील, अनिल देशपांडे, गुरुराज परदेशी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, वाॅन्लेसचे संचालक डॉ. नथानियल ससे यांची भेट घेऊन चर्चा केली.

Web Title: Raise covid beds in vans