शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

सांगलीत घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 21:19 IST

जनजीवन विस्कळीत : शहर जलमय, वाहनधारकांचे हाल

सांगली : शहरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सांगलीच्या व्यापारी पेठा, मुख्य चौक, रस्ते पाण्याने वेढले गेले. उपनगरांमध्येही अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.

सांगलीत बुधवारी सकाळी दहा वाजता पावसास सुरुवात झाली. दोन तास पावसाने शहराला झोडपून काढले. त्यामुळे सांगलीत सिटी पोस्ट, राजवाडा, दरबार हॉल परिसर, मारुती रोड, शिवाजी मंडई, स्टँड, झुलेलाल चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दिवसभर याठिकाणी पाणी साचून होते.

मारुती रोडवर पाणीमारुती रोडवरील दुकानांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी साचून होते. या रोडवरील भरलेला दिवाळी बाजारही पाण्यात गेला. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांचेही हाल झाले. पाणी निचरा होण्याची प्रतीक्षा दिवसभर करावी लागली.

शामरावनगर, संजयनगरात घुसले पाणी

सांगलीच्या शामरावनगर, संजयनगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नागरिकांना दिवसभर घरातून पाणी बादलीने बाहेर काढण्याची कसरत करावी लागली. या उपनगरांसह आनंदनगर, तुळजाईनगर, विद्यानगर आदी उपनगरांमध्येही तलावासारखे पाणी साचून राहिले. 

ऊसतोड मजुरांचे हालवसंतदादा कारखान्याच्या पिछाडीस ऊसतोड मजुरांनी पाली उभारल्या आहेत. त्यातही पाणी शिरले. फडात साचलेल्या पाण्यामुळे ऊसतोडीस गेलेल्या मजुरांचे हाल झाले, तर दुसरीकडे त्यांच्या पालीही पाण्यात गेल्या.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस