शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
3
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
4
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
5
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
6
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
7
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
8
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
9
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
10
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
11
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
12
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
13
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
14
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
15
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
16
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
17
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
18
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
19
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
20
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख

मिरजेत १२८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइनला रेल्वेमंत्र्यांची मान्यता, कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:27 IST

जंक्शनवरून रेल्वे वाहतूक सुलभ होणार : नवीन कॉर्ड लाइन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ लोहमार्गाला जोडणार

मिरज : मिरजरेल्वे स्थानकाजवळ १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाइन या १.७३ किमी प्रकल्पास रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासी व मालवाहतूक कार्यक्षमता वाढून मिरज जंक्शनवरून रेल्वे वाहतूक सुलभ होणार आहे.सध्या सोलापूर व बंगळुरू येथून मिरजेत येऊन कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्यांच्या इंजिनची दिशा बदलण्यासाठी गाड्या सरासरी दोन तास मिरजेत अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाइनमुळे हा विलंब दूर होणार आहे. मालवाहतूक, प्रवासी गाड्यांसाठी कॉर्ड लाइन स्थानक होणार असल्याने सोलापूर व बंगळुरू येथून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरला जलद प्रवासाची सोय होणार आहे.मिरज स्थानकात रेल्वेगाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी कॉर्ड लाइनच्या प्रस्तावास मध्य रेल्वेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून सोलापूर व बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता मिरज स्थानकात थांबावे लागणार नाही. कोल्हापुरातून पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र मिरज स्थानकातच येतील. मिरज स्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून कॉर्डलाइनमुळे येथे प्रवासी गाड्यांची गर्दी कमी होणार आहे.सोलापूर व बंगळुरूकडून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्या इंजिनाची दिशा बदलण्यासाठी मिरजेत थांबल्याने त्यासाठी वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून मिरजेत कोल्हापूर रेल्वे चाळ गेटपासून स्वतंत्र बायपास लाइनला मंजुरी मिळाली आहे.

इंजिन बदलावे लागणार नसल्याने वेळेची बचतनवीन कॉर्ड लाइन कोल्हापूर रेल्वे चाळीजवळ कोल्हापूर लोहमार्गाला जोडली जाईल. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना मिरज स्थानकात जाण्याची गरज राहणार नाही. इंजिनही बदलावे लागणार नसल्याने वेळेची बचत होईल. मिरज स्थानकापासून एक किमी अंतरावर असलेल्या कॉर्डलाइन स्थानकात एक अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल. बायपास कॉर्ड लाइनचा प्रयोग दौंड स्थानकातही झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेpassengerप्रवासी