शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Sangli: इटकरे येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा; साडे चार लाखांची रोकड जप्त

By शरद जाधव | Updated: November 4, 2023 18:38 IST

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आठजण ताब्यात

सांगली : इटकरे (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तब्बल चार लाख ५३ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त केली. पथकाने जुगार खेळणाऱ्या आठजणांना जेरबंद केले असून, यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संशयितांचा समावेश आहे.रोहित अरविंद भोसले (वय ३०), सुरज हणमंत साखरे (३२), शुभम अशोक सुर्यवंशी (२६), अभिषेक निवृत्ती सकटे (२३, सर्व रा. क्रांती चौक, इटकरे), अविनाश हणमंत नरळे (२९, रा. कुरळप), संदीप चंद्रकांत पाटील (३५, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), अवधुत प्रकाश दळवी (३२, रा. गंजीगल्ली, कोल्हापूर) आणि विशाल अशोक गिरीगोसावी (३०, रा. उमा टॉकीजजवळ, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, इटकरे फाट्याजवळील राजस्थानी हॉटेलच्या पाठीमागे काही अंतरावर मनोज माने यांच्या खुल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली.पथकाने तिथे जावून खात्री केली असता, सर्व संशयित जुगार खेळत होते. त्यांना पळून जाण्याची संधी न देता सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख ५३ हजार ३०० रुपयांची रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अरुण पाटील, विनायक सुतार, सुनिल जाधव, रोहन घस्ते, सुरज थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस