शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘गोवा मेड’बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा, सात जणांवर गुन्हा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By घनशाम नवाथे | Updated: August 17, 2024 19:30 IST

विजयनगरमध्ये भरारी पथकाची कारवाई

सांगली : गोवा राज्यातच विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून महाराष्ट्रातील कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने उघडकीस आणला. पथकाने विजयनगर चौकात तिघांना दारूची तस्करी करताना पकडून नंतर परिसरातील फ्लॅटवर छापा मारला. फ्लॅटमधील छोटेखानी कारखान्यात बनावट झाकणे लावून दारू सीलबंद करण्यात येत होती.भरारी पथकाच्या कारवाईत अब्दुलरझाक नजरूद्दीन मुलाणी (वय २६, रा. जमगे गल्ली, कवठेमहांकाळ), महंमदकैफ बशीर बागवान (वय २०, रा. थबडेवाडी रस्ता, कवठेमहांकाळ), सिद्दीक मुबारक नदाफ (वय १८, रा. दादा चौक, कवठेमहांकाळ) या तिघांना अटक करण्यात आली. तपासात पुरवठादार व ग्राहक अशा चौघांवरही कारवाई केली. एकूण १० लाख २९ हजारांचा मुद्देमाल कारवाईत जप्त केला.पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला विजयनगर चौकातील सत्राळकर स्क्वेअर इमारतीच्या पूर्वेला गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मोटार क्रमांक (एमएच १३, सीएस ७९५) थांबवली. मोटारीची तपासणी केली असता, त्यात विदेशी दारूचे २१ बॉक्स आढळले. मोटार तसेच दुचाकी क्रमांक (एमएच १०, ईएच १५०१) असा मुद्देमाल जप्त केला. तिघांच्या चौकशीत हा दारूसाठा विजयनगर येथील शिवदत्त आनंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भरला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे छापा टाकला, तेव्हा गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूची तस्करी करून येथे आणली जात असल्याची माहिती मिळाली.गोव्यातील दारू महाराष्ट्रात दारू विक्रीची परवानगी असलेल्या कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर बनावट झाकणे व सील लावले होते. त्यानंतर या दारूची परिसरातील हॉटेल, ढाब्यांवर बेकायदेशीरपणे विक्री केली जात होती. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात दारूसाठा, बनावट झाकणे, सील, रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य असा ८ लाख ८३ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी तिघांना अटक करून पोलिस कोठडी घेतली. त्यानंतर तपासात त्यांनी पुरवठा केलेल्या काही हॉटेल्स, ढाब्यांवरून दारूसाठा जप्त केला. बनावट झाकणे, सील करण्यास जागा देणारा मालक, पुरवठादार, ग्राहक अशा आणखी चौघांवरही कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६३० रुपयाचा दारूसाठा जप्त केला. एकूण ७ जणांवर कारवाई करून १० लाख २९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे, अजितकुमार नायकुडे, विनायक जगताप, दुय्यम निरीक्षक युवराज कांबळे, सुवास पोळ, रमेश चंदुरे, शरद केंगारे, सहायक दुय्यम निरीक्षक स्वप्निल कांबळे, आनंदमूर्ती भिसे तसेच वैभव पवार, स्वप्निल आटपाडकर, प्रकाश माने, शाहीन शेख यांनी कारवाई केली.

हॉटेल्स, ढाब्यांवर बेकायदा विक्रीउत्पादन शुल्कने बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर छापा मारल्यानंतर येथील दारू ही हॉटेल्स, ढाब्यांवर विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गोवा मेड दारूची राजरोस विक्री होत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस