राहुल गांधींनी जागवल्या पतंगराव कदमांच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:12 IST2019-04-06T00:12:03+5:302019-04-06T00:12:08+5:30
कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे ...

राहुल गांधींनी जागवल्या पतंगराव कदमांच्या आठवणी
कडेगाव : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी हडपसरकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राहुल गांधी म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शैक्षणिक प्रगतीत बहुमोल योगदान आहे. राज्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी डॉ. पतंगराव कदम यांनी घेतलेल्या परिश्रमाची आम्हाला जाणीव आहे.
त्यांचा वारसा जपणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांचे काम व संघटनकौशल्य कौतुकास्पद आहे. काँग्रेस पक्ष कदम कुटुंबीयांच्या पाठीशी कायम राहील.
यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम, बंधू डॉ. शिवाजीराव कदम, पुत्र आमदार डॉ. विश्वजित कदम, स्नुषा स्वप्नाली कदम, कन्या डॉ. अस्मिता जगताप, नातू अविर कदम उपस्थित
होते.