शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:47 IST

विहिरीत पाणी असूनही उपयोग नाही : महावितरणकडून एकाच रोहित्रावर जादा कनेक्शनचा फटका

सांगली : शेत ओलितासाठी पदरमोड करून शेतकऱ्याने शेतात विहीर खोदली. अनामत रक्कम भरून वीज पुरवठाही घेतला. मात्र, कृषीपंपाला पुरेसा वीजपुरवठा नसल्याने रब्बी हंगामातील पिके वाळू लागली आहेत. यासंदर्भात वारंवार महावितरणला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत. पण, या सर्व योजनांपेक्षाही कृषीपंपाला पुरेसा वीज पुरवठा मिळाला तरी पुरेसे आहे, अशी शेतकऱ्यांची माफक मागणी आहे. महावितरणकडे अनामत रक्कम भरून वीज जोडणी घेतली. हजारो रुपये खर्च करून मोटरपंप आणि आवश्यक साहित्यही खरेदी केले. मात्र, देण्यात आलेल्या वीजजोडणीला पुरेसा वीजपुरवठाच राहात नसल्याने पाण्याची सोय असताना पिकांना पाणी मिळत नाही. याची तक्रार महावितरणकडे करण्यात आली होती, असे शेतकरी सांगत आहेत. त्यांनी अवैधपणे वीजपुरवठा घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करीत विजेची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यानंतरही समस्या कायम आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज, शिराळा, वाळवा तालुक्यात सर्वाधिक वीज पुरवठ्याची समस्या आहे. नवे रोहित्र बसविण्यात आले होते. त्यावर ३२ मोटारपंपांच्या वीज जोडण्या असल्याने समस्या जशीच्या तशीच आहे. यासंदर्भात त्यानंतर वारंवार तक्रारी करूनही महावितरण याकडे डोळेझाक करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत उच्च दाबाने वीजपुरवठा करून समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी शेतकरी महादेव पाटील यांनी केली आहे.

काही फिडरवरच अडचणीमहावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महावितरणच्या काही फिडरवरच कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. याठिकाणी जादा विद्युत मोटारी असल्यामुळे अडचणी आहेत. येथे नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू आहे.

एकाच रोहित्रावर क्षमतेपेक्षा जादा विद्युत कनेक्शने दिली आहेत. यामुळे विहिरीत पाणी असूनही रब्बी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पिके वाळत आहेत. मोटर चालू केली की लगेच बंद पडते. सर्व गोष्टींची महाविरतणच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे. -संभाजी माळी, शेतकरी.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी