शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आबांसारखीच रोहित पाटील यांच्यातही कामाची तळमळ - खासदार नीलेश लंके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 14:15 IST

लोकांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आवाहन, रांजणी येथे सत्कार

रांजणी : रोहित पाटील यांच्याकडेही आर. आर. पाटील यांच्यासारखी कामाची तळमळ आहे. लोकांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले. ते रांजणी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते.यावेळी लंके, खासदार विशाल पाटील व रोहित पाटील यांचा सत्कार सरपंच नीलम पवार, उपसरपंच वैभव भोसले, लोणारवाडीचे सरपंच अजित खोत, उपसरपंच कोळेकर यांच्या हस्ते झाला. लंके म्हणाले, रोहित पाटील हे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाचे फिक्स आमदार आहेत. दिल्लीत अजूनही आबांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्याच मार्गावर रोहित पाटील यांची वाटचाल सुरू आहे. मतदारसंघाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. दूध दर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुतीचे सरकार अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार निश्चितपणे सत्तेवर येईल.

रोहित पाटील म्हणाले, आबांची मतदारसंघातील अपुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व आघाडीचे सरकार आणण्यासाठी पाठीशी राहावे. मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. झुरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे सुसज्ज सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनिता सगरे, संचालक सुरेश पाटील, पिंटू कोळेकर, गणेश पाटील, ताजोद्दीन तांबोळी, जीवनराव भोसले, संजय भोसले, संतोष पवार, शशिकांत पवार, हणमंत देसाई, अमोल भोसले, संताजी भोसले, अजित भोसले आदी उपस्थित होते. डॉ. वीरसेन पवार यांनी प्रास्ताविक केले.

दादा घराणे वाचविल्याबद्दल आभारयावेळी खासदार विशाल पाटील यांनी केंद्रातील सरकारवर टीका केली. पैसे वाचविण्याच्या नावाखाली अग्निवीर योजना आणून देशाच्या सुरक्षेशी व तरुणांच्या भावनांशी खेळले जात असल्याची टीका केली. वसंतदादांच्या घराण्याचे समाजकारण व राजकारण संपण्यापासून वाचविल्याबद्दल मतदारांचा मी ऋणी राहीन, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीnilesh lankeनिलेश लंकेRohit Patilरोहित पाटिल