आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:34+5:302021-02-16T04:28:34+5:30

यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सभापती ...

R. R. Distribution of Patil Sundar Gaon Award | आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण

आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराचे वितरण

यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सभापती आशा पाटील, प्रमोद शेंडगे, सदस्य संभाजी कचरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात२०१८-१९ अंतर्गत तालुकास्तरावर शिराळा तालुक्यातील वाडीभागाई, वाळवा तालुक्यातील कुरळप, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी, तासगाव तालुक्यातील सावर्डे, खानापूर तालुक्यातील रेणावी, कडेगाव तालुक्यातील शिरसगाव, मिरज तालुक्यातील सावळवाडी, आटपाडी तालुक्यातील तळेवाडी, पलूस तालुक्यातील रामानंदनगर, जत तालुक्यातील येळदरी. जिल्हा स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत मिरज तालुक्यातील सावळवाडी. २०१९-२० अंतर्गत तालुकास्तरावर तासगाव तालुक्यातील अंजनी, वाळवा तालुक्यातील केदारवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी, पलूस तालुक्यातील दुधोंडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, कडेगाव तालुक्यातील शिरगाव, आटपाडी तालुक्यातील औंटेवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिराळा तालुक्यातील कोकरूड, खानापूर तालुक्यातील पोसेवाडी, जिल्हा सुंदर गाव योजनेंतर्गत तासगाव तालुक्यातील अंजनी गाव या ग्रामपंचायतींना प्रशस्तिपत्र, रोप आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Web Title: R. R. Distribution of Patil Sundar Gaon Award