शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: बेकायदा पिस्तुलांचा नेम कायदा आणि सुव्यवस्थेवरच!, निवडणुकांमुळे आगामी दोन-तीन महिने जोखमीचे

By संतोष भिसे | Updated: November 19, 2025 19:49 IST

खेळण्यासारखी सापडताहेत हत्यारे, गुन्हेगारांसाठी गावठी कट्टा बनतोय स्टेटस सिम्बॉल

सांगली : जिल्ह्यात बेकायदा पिस्तुल किंवा गावठी कट्टा सापडला नाही, असा एकही महिना जात नाही. पोलिसांच्या कारवाईत सापडलेल्या पिस्तुलांचीच मोजदाद होते. न सापडलेल्या पिस्तुलांचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कदाचित याचा वापर कोठेतरी गोळीबारासाठी, कोठेतरी खुनासाठी किंवा खुनी हल्ल्यासाठी होतो. खुन्नस काढण्यासाठी थेट कमरेचे पिस्तुल काढले जाते. या बंदूकबाजीचा कायमचा बंदोबस्त का होत नाही? या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी पोलिसांकडे दिसत नाही.पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आजवरच्या सहा वर्षांत तब्बल १४६ बेकायदा पिस्तुले पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत त्याचे दीड शतक पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेळण्यासारखी मिळणारी ही पिस्तुले बहुतांशवेळा परप्रांतातूनच येतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पिस्तुल आणणाऱ्याला पकडले, पण ते तयार करणाऱ्या मुळापर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे आजही कधीतरी मिरजेत गांधी चौकात किंवा सांगलीत एसटी स्थानकात एखादी पिस्तुलाची कारवाई होतेच.गुन्हेगारांच्या दृष्टीने पिस्तुल बाळगणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. कोयता, चाकू-सूरा ही हत्यारे आता जणू जुनाट झाली आहेत. ‘दहशत निर्माण करायची तर पिस्तुल हवेच’ ही मानसिकता निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमधून येणारे गावठी कट्टे ५० हजार ते एक-दोन लाखांपर्यंत सहज उपलब्ध होतात. सांगली पोलिसांनी या राज्यांत मूळ पुरवठादारापर्यंत पोहोचण्यासाठी काहीवेळा धडक मारलीही होती, मात्र परप्रांताच्या मर्यादेमुळे ते सापडले नाहीत. सांगलीत पिस्तुल विकणाऱ्याला बेड्या ठोकण्यावरच माधान मानावे लागले.

खरेदी करणारा जाळ्यात यावापिस्तुल विकणाऱ्याला पकडल्यावर ते घेणारादेखील जाळ्यात यायला हवा. मागणी होत राहिल्यास पुरवठादेखील सुरूच राहणार आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा ही दोहोंची साखळी पोलिसांनी तोडली, तरच बेकायदा पिस्तुलांना पायबंद बसेल. नाहीतर कुपवाडसारख्या घटनेत रात्री-बेरात्री गोळीबार झाल्यावरच पोलिसांना जाग येईल, अशी स्थिती आहे.

आगामी दोन-तीन महिने जोखमीचेआगामी दोन-तीन महिने निवडणुकांचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेसाठी जोखमीचे आहेत. तब्बल सात-आठ वर्षांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये जोरदार टशन आहे. प्रचारादरम्यान, मतदान आणि निकालादिवशी आणि निकालानंतरही वातावरणात तणाव असणार आहे. या काळात बेभान कार्यकर्त्यांकडून पिस्तुले उपसली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने पोलिसांना सतर्क राहावे लागणार आहे.

वर्ष  - गुन्हे - आरोपी - पिस्तुल - काडतूस२०२०  - १२ -  ३० - १३ - ३०            २०२१ - १८ - २४ - २३  - ३९            २०२२  -१८ - २३ - २९ -  ४९२०२३  - २१ - ३४  - ३० -  ७२            २०२४ -  २७  - ३८ - २९ - ५७२०२५ - १९ - २६ - २२ - ३४            

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Crime: Illegal pistols threaten law and order before elections.

Web Summary : Sangli faces a surge in illegal pistols, mainly from other states. 146 pistols seized since 2020, but sources remain elusive. Upcoming elections heighten risk; police must target both sellers and buyers to curb gun violence.