शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:52 IST

फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून करत होता तस्करी

मिरज : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट प्रक्षेकांच्या पसंतीस उतरला असला तरी आता यातील रक्तचंदनाची तस्करी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कारण तस्करी करणारे आता अशाच प्रकारची शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन तस्करी करणाऱ्या एकाच्या मिरजेत पोलीस आणि वन विभागाने मुसक्या आवळल्या आहेत.आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात तस्करी होत असलेल्या दोन कोटी ४५ लाख ८५ हजाराचे ९८३ किलो ४०० ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून पकडले. यावेळी यासिन इनायतउल्ला (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले.पुष्पा स्टाईलने रक्तचंदन कर्नाटकातून मिरजेत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर व सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने वन विभागाच्या साह्याने याचा शोध सुरु  केला.  तस्करी होणारे रक्तचंदन रविवारी पहाटे मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली. 

फडणीस यांच्यासह पोलिस पथकाने मिरज – कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. यावेळी फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA-१३-६९०० हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात २ कोटी ८५ लाखाचे चंदन सापडले. हे चंदन जप्त करण्यात आले असून हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास  पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPushpaपुष्पाSmugglingतस्करी