शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यानंतर सांगलीत शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग, तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:46 IST

पुण्यात स्वारगेट स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर बसस्थानक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत

सांगली : पुणे ते सांगली शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार बुधवारी रात्री अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आष्टा ते सांगलीदरम्यान घडला.याप्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वैभव वसंत कांबळे (वय ३४, रा. दुधारी मारुती मंदिराजवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तत्पूर्वी प्रवाशांनी त्याला बेदम चोप दिला.शिरोळ तालुक्यातील ही २४ वर्षीय तरुणी पुण्यात नोकरीमुळे राहते. बुधवारी ती स्वारगेट ते सांगली शिवशाही बसमधून सांगलीला येत होती. संशयित वैभव कांबळे हादेखील बसमध्ये होता. रात्री ११ बस आष्टा बसस्थानकातून सांगलीकडे येत असताना त्याने खिडकीजवळून तसेच सीटच्या मधून हात काढून तिला स्पर्श केला. अश्लील चाळे करू लागला. बस सांगली स्थानकात आल्यावर तिने हा प्रकार बसचालकासह प्रवाशांना सांगितला.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत वैभवला ताब्यात घेतले. तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार वैभव कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.पुण्यात स्वारगेट स्थानकातील अत्याचाराच्या घटनेनंतर बसस्थानक आणि बसमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला होता. काल पुन्हा शिवशाही बसमध्येच तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटनेने खळबळ उडाली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला