शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-हुबळी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ येत्या रविवारपासून धावणार; सातारा, सांगली, मिरजेत थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 11:59 IST

कोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूच, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणारा सेतू

सांगली : ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खूशखबर मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी ‘वंदेभारत एक्स्प्रेस’ मंजूर केली आहे. हुबळी ते पुणे (गाडी क्र. २०६६९) व पुणे ते हुबळी (क्र. २०६७०) या दोन गाड्या मिरज, सांगली, सातारामार्गे येत्या १५ सप्टेंबरपासून धावणार आहेत. याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.पुणे-हुबळी वंदेभारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदेभारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती. या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी-पुणे मार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.

हुबळी ते पुणे अशी धावणारहुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला ५:१५ला, बेळगावला ६.५५, मिरजेत ९:१५ला, सांगलीत ९:३०ला, सातारा स्थानकावर १०:३५ तर पुण्यात दीड वाजता पोहोचेल.

पुण्यातून दुपारी २:१५ला सुटणारी वंदेभारत सातारा येथे ४:०८ला, सांगलीत ६:१०, मिरजेत ६:४५, बेळगावला ८:३५, धारवाडला १०:२० तर हुबळीत पावणेअकरा वाजता पोहोचेल.

‘वंदेभारत एक्स्प्रेस’ची वैशिष्ट्ये

  • आठ कोचची संपूर्ण वातानुकूलित गाडी
  • सोमवार सोडून रोज धावणार
  • ६६ किलोमीटर प्रतितास वेग
  • अंतर ५५८ किलोमीटर

किती वेळात होणार प्रवास

  • पुणे ते सांगली : ३.५५ तास
  • सांगली ते बेळगाव : २.२३ तास
  • सांगली ते हुबळी : ४.३३ तास
  • बेळगाव ते हुबळी : २.१० तास
  • पुणे ते हुबळी : साडे आठ तास

कोल्हापूरसाठी पाठपुरावा सुरूचकोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदेभारत एक्स्प्रेस मंजूर असून, विद्युतीकरणासह अन्य काही तांत्रिक कारणासाठी ती थांबवली आहे. लवकरच ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. -उमेश शहा, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेpassengerप्रवासीKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर