शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 13:35 IST

रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे यंत्राच्या साहाय्याने तोडून टाकण्यात येत आहेत

मानाजी धुमाळरेठरेधरण : पुणे ते बंगळुरू या आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. वाळवा तालुक्यात पेठनाका ते कासेगावदरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली लहान-मोठी झाडे तोडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर पेठनाका येथील पुलाच्या भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस असणारी व रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे यंत्राच्या साहाय्याने तोडून टाकण्यात येत आहेत. पाणी जाण्यासाठी असलेल्या पुलाच्या ठिकाणी सिमेंट पाइप टाकून बांधकाम करण्यात येत आहे.कासेगाव येथे रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या सुमारे ४० घरांचे बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येईल. त्याबाबत रहिवाशांना सूचना देण्यात आली आहे. त्यांच्या नुकसानभरपाईबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व ग्रामपंचायत पातळीवर निर्णय हाेणार आहे.महामार्गावर वाळवा तालुक्याच्या हद्दीतील येवलेवाडी फाटा, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी फाटा, वाघवाडी फाटा, कामेरी, येलूर येथील अपघातप्रवण क्षेत्रात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. कासेगाव व पेठ येथील उड्डाणपूल तसेच राहतील.शेंद्रे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी कराड येथे दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी केले होते. यानंतर काम कधी सुरू होणार याची उत्सुकता होती.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दोन पॅकेजमध्ये कागल-सातारा विभागात काम सुरू केले आहे. पॅकेज १ मध्ये कागल ते पेठनाका व पॅकेज २ मध्ये पेठनाका ते शेंद्रे-सातारा असे काम होणार आहे. दोन्ही पॅकेजसाठी दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. या सहापदरी रस्त्याचे व सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व्ही. डी. पंधरकर यांच्या देखरेखीखाली शेंद्रे ते पेठ नाका व पेठनाका ते कागल असे एकूण १३३ किलोमीटरचे काम होणार आहे.कागल ते पेठनाकापर्यंतचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्याचे आणि जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, पेठनाका ते शेंद्रेपर्यंतचे काम सुरू करण्यात आले आहे, ते डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष आहे, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेhighwayमहामार्ग