शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Sangli News: म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती, वीजबिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार

By संतोष भिसे | Updated: February 6, 2023 17:22 IST

१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते.

सांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती घ्यावी लागली आहे. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नसल्याने उपसा थांबविण्यात आला आहे. पंधरा दिवस पंप फिरविल्याने वीजबिलाचा नाहक भुर्दंड कृष्णा खोरे महामंडळाला सोसावा लागणार आहे.१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. अधिकाऱ्यांनीही पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. २० जानेवारीरोजी पंप सुरु करण्यात आले. पण अवघे १५ दिवसच सुरु राहिले. ३ फेब्रुवारीस विश्रांती देण्यात आली. या कालावधीत कृष्णेचे पाणी सलगरेत पाचव्या टप्प्यापलीकडेही जाऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे नियोजन जतपर्यंत पाणी नेण्याचे होते, पण मिरज तालुक्याची सीमाही ओलांडता आली नाही. पाणी कालव्यातून वाहत राहिले, शेतकऱ्यांनी मात्र उपसा केला नाही. जत तालुक्यातूनही मागणी अर्ज आले नाहीत. प्रशासनाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतींत मागणी अर्ज घेण्याची सोय केली होती. पण शेतकरी फिरकले नाहीत.सध्या थंडी अद्याप कायम असल्याने विहिरी व कुपनलिकांतील पाणीसाठे टिकून आहेत. ऊसतोड व द्राक्ष उतरण सुरु आहे. त्यामुळे पाण्याची गरज नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.दरम्यान, सलगरे येथे योजनेच्या पाचव्या पंपगृहात विद्युत पॅनलचे काम सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण पॅनल बदलण्यात येणार आहे. थकबाकी ९८ कोटींवर म्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी