शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी पोर्टलचा सर्व्हर क्रॅश, धूर तपासणीविनाच हजारो वाहने रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:59 IST

नाहक दंडाची शिक्षा

सांगली : वाहनांची धूर तपासणी करून प्रमाणपत्र देणारे (पीयूसी) पोर्टल आठवडाभरापासून ठप्प आहे. सर्व्हर क्रॅश झाल्याने वाहनांची तपासणी बंद आहे. यामुळे राज्यभरात हजारो वाहनांना नाहक दंडाच्या कारवाईला तोंड द्यावे लागत आहे.मार्चअखेर तोंडावर आल्याने पीयूसी केंद्रांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे; पण सर्व्हर कोलमडल्याने धूर तपासणी ठप्प झाली आहे. पोर्टल सुरू करताच एरर असा संदेश येत आहे. याबाबत पीयूसी चालकांच्या संघटनेने परिवहन आयुक्तालयाकडे तक्रार केली असता दुरुस्तीचा काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.तांत्रिक दोष असल्याने आमच्या हातात काही नाही, असेही उत्तर मिळाले. परिणामी, गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सर्व वाहनांची धूर तपासणी बंद आहे. कागदपत्रे अपलोड होत नसल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. राज्यभरातील सर्व पीयूसी केंद्रे बंद आहेत.

नाहक दंडाची शिक्षाराज्यभरात ५० जिल्ह्यांत मिळून सुमारे २२०० पीयूसी केंद्रे आहेत. तेथील कामकाज ठप्प झाल्याने वाहने धूर तपासणीविनाच रस्त्यावरून धावत आहेत. यातील अनेक वाहनांची प्रमाणपत्रे मुदतबाह्य झाली आहेत. पोलिस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगूनही वाहनमालकांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.सर्व्हर हॅक..?धूर तपासून पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या पोर्टलचा सर्व्हर हॅक झाल्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली; पण प्रशासनाने त्याला दुजोरा दिलेला नाही. यापूर्वीही आरटीओचे पोर्टल हॅक करून बनावट प्रमाणपत्रे देण्याचे प्रकार घडले आहेत. वाहन परगावी असताना, ते पीयूसी केंद्रासमोरच असल्याचे दाखवून अवघ्या २००-३०० रुपयांत प्रमाणपत्र देण्याचे प्रकार घडले होते. ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकल्यानंतर परिवहन आयुक्तांनी धूर तपासणीसाठी जिओ टॅगिंगची सक्ती केली. त्यानुसार पीयूसी केंद्रापासून पाच-दहा मीटर अंतरातच वाहन असेल, तर प्रमाणपत्र मिळते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूर