आदर्श शाळा उपक्रमात लाेकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST2021-03-10T04:27:33+5:302021-03-10T04:27:33+5:30

ओळ : आरळा (ता. शिराळा) येथे आयाेजित ग्रामस्थांच्या सहविचार सभेत उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Public participation is important in an ideal school activity | आदर्श शाळा उपक्रमात लाेकसहभाग महत्त्वाचा

आदर्श शाळा उपक्रमात लाेकसहभाग महत्त्वाचा

ओळ : आरळा (ता. शिराळा) येथे आयाेजित ग्रामस्थांच्या सहविचार सभेत उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : जिल्हा परिषदेच्या माॅडेल शाळा करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार शाळा डिजिटल करून शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवावा. माझी शाळा आदर्श शाळा झाली पाहिजे, त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.

आरळा (ता. शिराळा) येथे ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत सहविचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच आनंदा कांबळे होते.

नायकवडी म्हणाले, जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. माॅडेल शाळा करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार शाळा डिजिटल करून शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवावा.

माझी शाळा डिजिटल झाली पाहिजे. यासाठी शिक्षकांबरोबरच ग्रामस्थांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

शाळा हेच मंदिर आहे. शिक्षण हे पिढ्यान् पिढ्याचे दारिद्र्य घालवून देणार आहे.

मुख्याध्यापक अरविंद सुतार यांनी स्वागत केले. यावेळी आरळाच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, अलिशा मुलाणी, सरपंच आनंदा कांबळे, उपसरपंच सदाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यानी आभार मानले.

चौकट

गरिबांची मुले शिकणार कशी?

शाळांचे खासगीकरण होत आहे. मोबाईल रेंज नाही, परिस्थितीमुळे ॲन्ड्राॅईड मोबाईल घेता येत नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. मग डोंगरकपारीतील मुलांना दिशा कोण देणार. गरिबांची मुले शिकणार कशी, असा उद्विग्न सवाल उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी उपस्थित केला.

Web Title: Public participation is important in an ideal school activity