सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 89.17 कोटी रुपयांचा अधिकच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:02 PM2021-02-13T12:02:37+5:302021-02-13T12:04:22+5:30

funds collector Sangli- जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 230.83 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत 89.17 कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 320 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Provision of additional fund of Rs. 89.17 crore for the development of Sangli district | सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 89.17 कोटी रुपयांचा अधिकच्या निधीची तरतूद

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 89.17 कोटी रुपयांचा अधिकच्या निधीची तरतूद

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 89.17 कोटी रुपयांचा अधिकच्या निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेच्या 320 कोटीच्या आराखड्यास मान्यता

सांगली/पुणे : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी 230.83 कोटी रुपये नियतव्ययाची मर्यादा नियोजन विभागाने ठरवून दिली होती. परंतु त्यामध्ये आज झालेल्या बैठकीत 89.17 कोटी रुपयांनी वाढ करून सर्वसाधारण योजनेसाठी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 320 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरूण लाड, मानसिंग नाईक, विक्रम सावंत, अनिल बाबर, सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Provision of additional fund of Rs. 89.17 crore for the development of Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.