शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत हे अल्पसंख्यांक द्वेषी - आमदार इद्रिस नायकवडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 13:38 IST

मिरज : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रिस नायकवडी हे ‘वंदे मातरम’च्या विरोधात असल्याचा आरोप ...

मिरज : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रिस नायकवडी हे ‘वंदे मातरम’च्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. अल्पसंख्यांकाबद्दल द्वेष असल्याने राऊत असे खोटे आरोप करीत आहेत. माझ्या नादी त्यांनी लागू नये, त्यांना मी परवडणार नाही, असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिला.नायकवडी म्हणाले, राज्यात सात जणांची नियुक्ती झाली, मात्र इद्रिस नायकवडी हे राऊत यांना खूपत आहे. अल्पसंख्यांक समाजाबद्दल राऊत यांची द्वेषाची भावना आहे. आजपर्यंत कोणावरही केलेले आरोप संजय राऊत सिद्ध करू शकले नाहीत. मी ‘वंदे मातरम’ला विरोध केलेला नाही. त्याबद्दल मला आदरच आहे.मिरजेत सनातन प्रभात कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात माझा संबंध नसतानाही त्यात मला गुंतवले होते. यातून न्यायालयाने माझी निर्दोष सुटका केली. मग संजय राऊत काय न्यायालयापेक्षा मोठे आहेत का? विधान परिषदेत मुस्लीम समाजाचा प्रतिनिधित्व करणारा मी एकमेव असल्याने संजय राऊत यांना खूपत आहे. त्यांनी माझ्यावरील आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.

शरद पवार यांनी शब्द पाळला नाहीराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानपरिषदेवर संधी देतो म्हणून २५ वर्षांपूर्वी माझे वडील इलियास नायकवडी यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास भाग पडले. मात्र शब्द पाळला नाही. मात्र अजित पवार यांनी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी व आमदार म्हणून मला संधी दिली. त्यांच्याकडून इतरांनी नैतिकता शिकावी, असा टोला नायकवडी यांनी लगावला.

विधानपरिषदेत आवाज उठवणारविधानपरिषदेत एकमेव मुस्लीम सदस्य आमदार म्हणून आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तासगाव, इस्लामपूर व शिराळा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेस